Tuesday 13 October 2015

श्री कर्दळीवन परिक्रमा एक अनुभव



सौ. मीरा अरुण चाफाडकर, ८९७५५७६२४६
कर्दळीवन सेवा संघातर्फे आयोजित चौदाव्या परिक्रमेमध्ये आम्ही गोव्यातून बारा सदस्यांनी भाग घेतला होता. या परिक्रमेत सहभागी होण्यापूर्वी प्रा. क्षितिज पाटुकले यांचे पुस्तक वाचनात आले. पुस्तकातील माहिती वाचून अंगावर शहारे आले. मनामध्ये खूपच कुतूहल निर्माण झालं! 


या परिक्रमेमध्ये जवळजवळ पन्नास सदस्यांनी भाग घेतला होता. दोन-तीन दिवसांत सर्व सदस्यांमध्ये छान ओळख होऊन आपुलकीही निर्माण झाली. दि. २५ डिसेंबर २०१३ ते २८ डिसेंबर २०१३ पर्यंतचा काळ आमच्यास संसारापासून कितीतरी दूर निघूल आलो होतो व कुटुंबातील सदस्यांना तीन दिवस संपर्क होणार नाही याचीही कल्पना दिली होती. पण ते तीन दिवस आम्ही निश्चिंत होतो.

आत्ताचं आरामदायी व सुखसोयींचं जीवन व कर्दळीवनातील मुक़्काम यामध्ये खूपच फरक आहे; पण कोणतीही अडचण भसली नाही. व्यंकटेश किनाऱ्यावरील मुक़्कामी ’राजस जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या’ या कवितेची (संत तुकडोजी महाराज), शालेय जीवनात अभ्यासलेल्या कवितेची आठवण झाली.
व्यंकटेश किनारा ते अक़्कमहादेवी गुफा मंदिरापर्यंतचा प्रवास व नंतर गुंफेतील दोन दिवसांच्या मुक़्कामात मन प्रसन्न झाले. किनारा ते अक़्कमहादेवी गुंफा मंदिरापर्यंत वाटेत लागलेली मोठी चढण कशी पार केली ते कळले देखील नाही. चढण चढताना दमलो होतो पण वाटेत कुठेही बसावेसे वाटले नाही. कुठल्यातरी अनामिक ओढीने ती चढणे आम्ही सहज पार केली. त्यानंतर श्री स्वामी समर्थ प्रकटस्थान व बिल्ववन येथे आल्यानंतर तो निसर्ग व पवित्र वातावरण पाहून स्वर्गात असल्याचा आनंद झाला.
श्री स्वामी समर्थांच्या प्रकाटस्थानी अंघोळी उरकून प्रत्येकजण आपापल्या साधनेमध्ये मग्न होता. मी व माझी मैत्रीण स्वामींच्या नामस्मरणासाठी जागा शोधू लागलो तेव्हा एका गृहस्थाने जवळच्या दगडाकडे बोट दाखविले व आम्हाला पण ती जागा आवडली, आम्ही दोघीजणी त्या दगडावर जाऊन बसलो. काही वेळाने मन स्थिर झाले. थोडा वेळ तर माझ्या डोळ्यांतून पाणी वाहत होते. मानतल्या मनात स्वामींचे नामस्मरण चालू होते. अचानक कुणाच्या तरी स्पर्शाने जाग आली. दोघांनी डोळे उघडून पाहिले तर तो कुत्र्याचा स्पर्श होता. व्यंकटेश किनारा ते बिल्ववनापासून परत स्वामी समर्थ प्रकट स्थानापर्यंतचा प्रवास या कुत्र्याने आमच्या सोबत केला होता.
क्षणभर वाटले आमच्याबरोबर इतर मैत्रिणी होत्या त्यांच्यापैकी कुणाच्यातरी ओढणीचा स्पर्श झाला असेल!
नंतर खिचडीचा प्रसाद घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.
परिक्रमेच्या शेवटच्या दिवशी जेव्हा सर्व सदस्य व्यंकटेश किनारी येऊन चहा नाश्ता आटोपून बोटीमध्ये बसून श्रीशैल्यमच्या बाजूने परतीच्या प्रवासाला निघालो, ‘दिगंबरा दिगंबरा’ अशा नामघोषात जेव्हा बोटीने किनारा सोडला त्यावेळी आम्हाला तीन दिवस अन्नपाणी पुरविणारे अप्पाजी हात हलवत निरोप घेण्यासाठी किनाऱ्यावर उभे राहिले तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. जणूकाही स्वामीच्या रुपात अप्पाराव आम्हाला सांगत होते, “घाबरु नका, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.”


Friday 12 December 2014





Buy Our Books on amazon.in

Home Delivery / Cash on Delivery also available..




Kardaliwan Seva Sangh
622, Janaki Raghunath, Pulachi Wadi, Near Z Bridge, deccan Gymkhana, Pune-04
Phone : 020-25534601 Mobile: 9657709678 / 9371102439
Email : swami@kardaliwan.com  /  Website: www.kardaliwan.com
कर्दळीवन: पंच परिक्रमा :
A¸$bH$moQ>Mo lr ñdm_r g_W© ho H$X©irdZmV àH$Q> Pmbo. Jwê$M[aÌm_Ü`o H$Wm ^mJ Agm Amho H$s lr Z¥qgh gañdVr ho 13 ì`m eVH$mV lr e¡ë` Odirb H$X©irdZmV nmVmiJ§JoÀ`m nmÌmV ~wÅ>rV ~gyZ Jobo Am{U VoWo EH$m AídËW d¥jmImbr ~gyZ Ë`m§Zr Vn:gmYZm Ho$br. Vo ~gboë`m {R>H$mUr Ë`m§Mo^modVr dmê$i V`ma Pmbo. AerM gmSo>VrZeo df} Jobr. EH$ bmHy$S>VmoS>çm PmS>mMo bmHy$S> VmoS>VmZm Ë`mMm AmKmV hmodyZ Ë`m§Mr g_mYr ^§J nmdbr. Voìhm Ë`m dmê$imVyZ A¸$bH$moQ>Mo lr ñdm_r g_W© àH$Q> Pmbo. lr e¡ë` `m Á`mo{V{bªJmOdi H¥$îUm ZXr nmVmiJ§Jm ê$nmZo OdiOdi 200 {H$._r. dmhVo. hm gd© n[aga AË`§V KZXmQ> AaÊ`mZo doT>bobm Am{U XwJ© Agm Amho.
H$X©irdZmV M|MwAm `m O_mVrMo Am{Xdmgr bmoH$ ahmV AmhoV. BVa VrW©joÌr Amnë`mbm BÀN>m Pmbr H$s bJoM OmVm `oVo. H$X©irdZmV Om`bm AdYwVm§Mr Am{U ñdm_tMr BÀN>m Agë`m{edm` OmVm `oV Zmhr. ^maVmV Xadfu 1 bmImVyZ 1 ì`º$s H$mer-am_oídabm OmVo, 10 bmImVyZ 1 ~Ðr Ho$XmaZmWbm OmVo, 25 bmImVyZ 1 Z_©Xm n[aH«$_m H$aVo, 50 bmImVyZ 1 H¡$bmg _mZg gamoda `mÌobm OmVo. _mÌ H$X©irdZmV 1 H$moQ>rVyZ EImXrM ^m½`dmZ ì`º$s OmVo. Ë`m_wio H$X©irdZm {df`r bmoH$m§Zm \$ma _m{hVr Zmhr. H$X©irdZ ZdZmW Am{U ZmWn§Wr gmYy, `moJr `m§Mo gmYZmñWi Amho. VgoM Vr {gÕm§Mr ^y_r Amho. H$X©irdZmV {dbjU X¡dr AZw^d `oVmV.
कर्दळीवन परिक्रमा करण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे श्रेशैल्य येथे जावून तेथून होडीने किंवा यांत्रिक बोटीने २४ कि.मी. चा प्रवास करुन व्यंकटेश किनारी जाणे आणि तेथून कर्दळीवनात प्रवेश करणे. दुसरा मार्ग म्हणजे हैद्राबाद येथून श्रीशैल्य येथे येत असताना श्रीशैल्यमच्या अलिकडे साधारण ४० कि.मी अंतरावर अक्कमहादेवी मंदिराकडे जाण्याचा रस्ता दिसतो. तेथे मुख्य रस्त्यावर उतरुन किंवा गाडी तेथेच ठेवून साधारणपणे ५ ते ६ कि.मी. चालत अक्कमहादेवी मंदिराकडे यायचे. तेथून यांत्रिक बोट, होडी किंवा बांबूच्या बुट्टीत बसून समोरच्या किनाऱ्यावरील व्यंकटेश किनारा येथे यायचे आणि कर्दळीवनात प्रवेश करायचा. अक्कमहादेवी मंदिर ते व्यंकटेश किनारा हे पाताळगंगेतील दोन समोरासमोरचे २ कि.मी. अंतरावरचे किनारे असून साधारणपणे १० मिनिटात अक्कमहादेवी मंदिराच्या तीरावरुन व्यंकटेश किनाऱ्यावर पोहोचता येते. दोन्ही मार्ग चांगले असून कोठल्याही मार्गाने गेले तरी कर्दळीवनात जाता येते. व्यंकटेश किनाऱ्यावर एका साधू महाराजांनी झोपडी बांधली असून तेथेच कोळी समाजातील १० ते १२ कुटुंबियांची कच्ची घरे आहेत. कर्दळीवनात जाणाऱ्या सर्व यात्रेकरुंना येथे सर्वप्रकारचे सहाय्य मिळते. मात्र या सर्वांची भाषा तेलगू आहे. एखाद्याला तोडके मोडके हिंदी आणि इंग्रजी येते. येथे आधी सांगितल्यास चहा, नाष्टा, आणि भोजनाची व्यवस्था होते. तसेच उघड्यावर निवासही करता येतो. मात्र बाकी कसलीही राहण्याची विशेष सोय, संडास, बाथरुम, गरम पाणी वगैरे व्यवस्था येथे उपलब्ध नाही. तेथील स्वामी आणि इतर व्यक्ती आपल्याला गरजेप्रमाणे सहाय्य उपलब्ध करुन देतात. सध्या मोबाईल सेवेमुळे त्यांचेशी संपर्क साधून आधी व्यवस्था करता येवू शकते. श्रीशैल्य येथून पाताळगंगेकडे येताना साधारण २ कि.मी. अंतर आहे. मंदिरापासून वडाप रिक्षा तसेच स्वतंत्र रिक्षा उपलब्ध आहेत. पाताळगंगेमध्ये खाली ६५० पायऱ्या उतरुन उतरावे लागते. आता तेथे रोप वे सुविधा उपलब्ध आहे. हा रोप वे सकाळी ७ ते रात्री ७ पर्यंतच सुरु असतो. पाताळगंगेच्या किनाऱ्यावर आल्यावर तेथे अनेक यांत्रिक बोटी आणि होड्या व्यंकटेश किनारी जाण्यास उपलब्ध असतात. तेथून व्यंकटेश किनाऱ्याला पोचायला साधारण २४ कि.मी.प्रवास पाण्यातून करावा लागतो. त्यासाठी ५० ते ६० मिनिटे इतका कालावधी लागतो. आधी संपर्क साधून व्यवस्था केल्यास आणि मोठा ग्रुप असल्यास सर्वांना सोयीचे जाते. व्यंकटेश किनाऱ्यावरुन परत येताना जर आधीच तारिख, वार आणि वेळ सांगितली तर त्यावेळी या बोटी व्यंकटेश किनारी आपल्यासाठी येवून थांबतात.
          कर्दळीवनात जाताना पहिला टप्पा व्यंकटेश किनारा ते अक्कमहादेवीची गुहा असा आहे. हा साधारणपणे ९ कि.मी.चा मार्ग आहे. यावेळी ६ पर्वत चढून जावे लागतात. त्यानंतर एक पठार लागते. शेवटी अक्कमहादेवी गुहा लागते. या मार्गावरील पहिलेच चढण खडतर आहे. पहिल्या पर्वतावरची चढण सरळसोट आणि उभी अशी आहे. त्यामुळे खूपच दमछाक होते. त्यानंतर दुसरा आणि तिसरा पर्वत हेही चढण अवघड आहे. चहूबाजूला दाट झाडी आणि त्यातून खाचखळग्यातून जाणारी पायवाट असे रस्त्याचे स्वरुप आहेत. संपूर्ण मार्गावर लाल रंगाच्या ऑईलपेंटने खुणा करुन ठेवल्या आहेत. त्यामुळे वाट सापडणे सोपे जाते. चौथा, पाचवा आणि सहावा हे पर्वत थोडे सुसह्य आहेत. त्यानंतर पठार लागते. या पठारावर जाताना एके ठिकाणी एका पत्थरावर श्री स्वामी समर्थांचे पाऊल उमटलेले दिसते. पहिला पर्वत चढून गेल्यावर पुढचे दोन पर्वत पुढील तीन पर्वतांपेक्षा कमी उंचीचे आणि खोलगट भागात असल्याने अधिक दमछाक होते. अर्थात ९ कि.मी अंतर हे फारसे कठीण नाही. या प्रवासात मात्र सतत आजूबाजूला पहात सावधपणे गेले पाहिजे. जाताना कुत्रा, गायी यांचा सहवास लाभतो. तसेच सहा पर्वत चढून पठारावर गेल्यावर मोठी मोठी वारुळे दृष्टीस पडतात. तसेच नागराज, मोठे सर्प, क्वचित प्रसंगी अजगराचेही दर्शन होते.
अक्कमहादेवीची गुहा ही मोठी असून एका वेळी ३०० हून अधिक माणसे राहू शकतील इतकी विस्तिर्ण आहे. या ठिकाणी एक शिवलिंग, अक्कमहादेवीची मूर्ती आणि नरसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती आहे. इथेच एक बारमाही वाहणारा अत्यंत स्वच्छ पाण्याचा झरा आहे.त्याला भरपूर पाणी असते. हे पाणी अतिशय चविष्ठ आणि थंडगार असून त्याचा स्वाद जिभेवर रेंगाळत राहतो. या ठिकाणी आपण भोजन तयार करु शकतो आणि मुक्काम करु शकतो. व्यंकटेश किनाऱ्यावरुन येथे येण्यास सामान्य चालीने  ४ तास लागतात. अगदी हळू आल्यास ६ तास लागतात. इथे आल्यावर सर्व श्रम परिहार होतो आणि तेथील अद्‍भुत आनंदाने आणि वातावरणाने आपण भारुन जातो.
          अक्कमहादेवी गुहेपासून पश्चिमेकडे कर्दळीवनातील दत्तप्रभू आणि स्वामी समर्थांच्या मूळ स्थानाकडे जायचा रस्ता आहे. हा कर्दळीवनातील दुसरा टप्पा ६ कि.मी. अंतराचा आहे. हा रस्ता बहुधा सरळसोट आहे. मधे थोडाफार चढ उतार येतो. मात्र या रस्त्यावर अतिशय घनदाट आणि निबिड अरण्य आहे. अगदी दिवसासुद्‍धा सुर्यकिरणे जमिनीवर पोहोचू शकत नाहीत. या रस्त्याची सुरवात होतानाच अक्कमहादेवीच्या गुहेजवळ पूर्वेकडे एक विस्तीर्ण पठार आहे. मूळ स्थानाकडे जातानाचा मार्ग कठीण आहे. एका पाण्याच्या प्रवाहाबरोबर आपल्याला जावे लागते. ठिकठिकाणी पाणी साठलेले असते. दाट झाडी, किर्र काळोख, पायवाटेच्या दोन्ही बाजूला १० ते १५ फूटी उंच वारूळे असा हा प्रवास आहे. किती तरी ठिकाणी पायवाटेवरील अडथळे, वेली, पडलेली झाडे दूर करीत पुढे जावे लागते. या परिसरात अनेक हिंस्त्र श्वापदे वास करुन आहेत. उदा. अस्वले, लांडगे, कोल्हे, तरस, वाघ, याचबरोबर नाग, सर्प, अजगर इ. सरपटणारे प्राणी. त्यामुळे अतिशय सावधपणे या वाटेवर जावे लागते. साधरण ६ कि.मी. अंतरावर मूळ स्थान आहे. या ठिकाणी रस्त्यामध्ये बाबूंची वने, काटेरी वृक्ष पार करुन जावे लागते. रस्त्यात काही ठिकाणी दलदल लागते. मोठ्या मोठ्या आकाराच्या मुंग्या, किटक, कोळ्यांची जाळी रस्त्यात लागतात. मानवाने अजिबात हस्तक्षेप न केलेले हे ठिकाण आहे, याचा पदोपदी अनुभव येतो. शेवटी ज्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर आपण चालत येतो त्याचे रुपांतर एका छोट्याशा धबधब्यात होते आणि तो लहानशा दरीत कोसळतो. या प्रपाताच्या मागे दगडांची एक कपार तयार झाली असून त्याच्या कोपऱ्याला एक छोटीशी गुहा आहे. हेच दत्तप्रभूंचे आणि स्वामी समर्थांचे मूळ स्थान या ठिकाणी वड, पिंपळ आणि औदुंबर हे तीन वृक्ष एकमेकांना चिकटून खूप उंच वाढलेले आहेत. जणू हजारो वर्षांपासून दत्तप्रभूंवर मायेची सावली धरुन ते उभे आहेत असे वाटते. प्रपाताच्या बाजूने कपारीच्या वर आणि सभोवती या वृक्षांची मुळे आडवी पडलेली आहेत. कोपऱ्यातील गुहेमध्ये श्री. नृसिंह सरस्वतींची एक मूर्ती आहे. मध्यभागी एक शिवलिंग आहे. तेथे श्री स्वामी समर्थांचा आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा एक फोटो आहे. हेच ते मूळ ठिकाण. ज्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर आपण येथे येतो तोच प्रवाह तसाच पुढे वहात जातो आणि पुढे पाताळगंगेला मिळतो. मूळस्थानापासून साधारणपणे तीन ते चार कि.मी. अंतरावर हा प्रवाह खूप उंचीवरुन खोल खाली पाताळगंगेमध्ये पडतो. हा कर्दळीवनाच्या यात्रेतील तिसरा टप्पा आहे. बहुतेक सर्व व्यक्ती मूळ स्थानावरुनच परत फिरतात. पण हा तिसरा टप्पा सुद्‍धा अतिशय विलक्षण आहे. हा रस्ता सरळ आहे. मात्र तो काटेरी वृक्ष, वारुळे, दाट वृक्षराजीतून जाणारा असा आहे. या मार्गातील वनालाच बिल्ववन असे म्हटले जाते. याच्या टोकाला जिथून पाण्याचा प्रपात पाताळगंगेत पडते त्या ठिकाणी मार्कंडेय ऋषींना भगवान शिव शंकराने दर्शन दिले होते आणि अमृत प्रदान केले होते अशी कथा आहे. येथे जर किमान एक तासभर बसून ध्यान केले तर आपल्या अंगावरही अमृतधारा पडतात असा अनुभव आहे. अगदी भर दुपारीही तेथे आकाशातून पाण्याचे तुषार अंगावर पडतात.
          परतीचा प्रवास त्याच मार्गावरुन करावा लागतो. मूळ स्थान ते अक्कमहादेवी गुहा आणि तेथून व्यंकटेश किनारा असा हा प्रवास आहे. व्यंकटेश किनाऱ्यावरुन श्रीशैल्य येथे परत येवून श्रीदेव मल्लिकार्जुन आणि श्री देवी भ्रमराम्बा यांचे दर्शन घ्यावे. कर्दळीवन परिक्रमेच्या अनुभूती अत्यंत विलक्षण आहेत. हजारो भाविकांनी श्रीदत्तात्रेयांवर आणि श्रीस्वामी समर्तांवर पूर्ण श्रद्धा ठेऊन कर्दळीवन परिक्रमा पूर्ण केल्या आहेत.

कर्दळीवन सेवा संघ आयोजीत कर्दळीवन पंच परिक्रमा:
खालिल लिंक्सवर क्लिक करा..